आदिम जाति मिना ट्रस्ट तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप; साहित्यिक संजय पाटील मायखोपकर हस्ते ज्ञानवर्धक पुस्तके भेट
आदिम जाति मिना ट्रस्ट तर्फे शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप; साहित्यिक संजय पाटील मायखोपकर हस्ते ज्ञानवर्धक पुस्तके भेट
केळवे प्रतिनिधी
मायखोप जि.प.मराठी शाळा प्रार्थना सभागृहात आदिम जाति मिना विकास असोसिएशन ट्रस्ट मुंबई आयोजित शालेय उपयोगी वस्तू व कपडे,बूट वाटप कार्यक्रम ट्रस्ट पदाधिकारी हंसराज मिना,संजय मिना व सर्व मीना समाजसेवक यांच्या हस्ते पार पडला.यावेळी वाचन संस्कृती निरंतर सुरु राहावी.विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पुस्तक व्यतिरिक्त इतर ही मनोरंजक पुस्तके वाचायला मिळावी, हवीत म्हणून राजेश पाटील-हितेंद्र रामचंद्र पाटील यांनी भेट दिलेली पुस्तके व मोहिनी कथासंग्रह शाळेच्या मुख्य शिक्षिका प्रिती पाटील याना साहित्यिक संजय पाटील मायखोपकर त्याच्या हस्ते देण्यात आली.सदर कार्यक्रमात आदिम ट्रस्टच्या मार्फत लेखक संजय पाटील यांच्या राजस्थान ची छान असलेला फेटा बाधुन सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रमाची संकल्पना शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संतोष पाटील ,मनोज पाटील याची होती.याच बरोबरच मायखोप ग्रामपंचायत हद्दीतील शाळा व अंगणवाडी विद्यार्थ्यांना ही शालेय वस्तू वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमात बालवाडी शिक्षिका विशाखा किणी, छाया भोईर, ममता पाटील व शाळेतील शिक्षिका प्रिया भोईर, सुजाता राऊत तसेच ग्रामपंचायत मायखोप उपसरपंच स्वप्निल भोईर,सदस्या सिध्दी पाटील उपस्थित होत्या .