वाहतुकीची कोंडी ठरते नांदूरकरांची डोकेदुखी; ठोस उपाययोजना करण्याची उपसरपंच ज्योती शेळके यांची मागणी
वाहतुकीची कोंडी ठरते नांदूरकरांची डोकेदुखी;
ठोस उपाययोजना करण्याची
उपसरपंच ज्योती शेळके यांची मागणी
नांदूर शिंगोटे प्रतिनिधी
नांदूर शिंगोटेकरांचा वाहतुक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे.वाहतूक कोंडी ही एक नांदूर शिंगोटेकरांची डोकेदुखी झाली आहे. दिवस रात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.विशेषता निमोण नाका परिसरामध्ये या वाहतूक कोंडीने दिवसेंदिवस वेगळे वळण घेतल्याचे चित्र दिसते. यावर ठोस उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती त्यावेळी कायमस्वरूपी एका वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्याची मागणी नांदूरकरांनी केली होती मात्र आजपर्यंत यावर कुठलीही ठोस उपाययोजना झालेली नाही.
या ठिकाणी संगमनेर कडून येणारी वाहतूक सिन्नर कडून जाणारी वाहतूक व नगर कडून येणारी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली असून बायपास बाह्य वळण रस्त्याचे काम सुरू असल्याने व या ठिकाणी मोठे खड्डे निर्माण झाल्याने सर्वच लहान मोठे अवजड वाहने ही नांदुर-शिंगोटे गावातून ये जा करत असून यामुळे निमोण का परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी एक एक तास सुद्धा वाहने उभी करावी लागतात वाढते खड्ड्यांचे साम्राज्य रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने याला अडथळा ठरत आहे त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी दिवसेंदिवस जाणवत आहे त्यातच रस्त्यामध्ये कुठेही वाहने पार्क करण्याचा प्रकार या ठिकाणी जास्तच वाढलेला आहे दुचाकी व चारचाकी वाहने कुठेतरी रस्त्यात उभी करून वाहतुकीला कोंडी निर्माण करण्याचा प्रकार हा निर्माण झालेला आहे पोलीस प्रशासनाने याबाबत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे या ठिकाणी या वाहतुकीच्या कोंडीमुळे लहान मोठे अपघात घडत आहेत त्यातच याच ठिकाणी यो या परिसरामध्ये शासकीय कार्यालय शाळा दवाखाने पतसंस्था बँका यांचा मोठा वावर आहे या वावरामुळे या ठिकाणी परिसरातील दहा ते बारा गावातील लोक व्यवहारासाठी बँकेमध्ये येत असतात व त्यामुळे पार्किंगचेही पूर्णता तीन तेरा वाजले आहे कुठेही रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून लोक बिंदिक्तपणे वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे मात्र पोलीस प्रशासनाने यावर क** कारवाई करणे ही तितकेच गरजेचे आहे या भागांमध्ये योग्य रीतीने नियोजन जर केले तर वाहतूक कोंडी होणार नाही मात्र याकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ मिळत नाही व त्यातच पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा होत आहे .
वरिष्ठ पातळीवरून वाहतुकीचा प्रश्न कायमचा सोडवणे गरजेचे आहे 24 तास या ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे त्यासाठी ही उपाययोजना होणे गरजेचे आहे सायंकाळच्या वेळेसही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहनांची कोंडी होत असते त्यातच दिवसभरामध्ये शालेय विद्यार्थ्यांना प्रस्तावना जीवाची कसरत करावी लागते त्यातच सकाळच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थी यांना ये जा करावी लागते त्यातच नजदीकच बस स्थानक असल्यामुळे आणखीच वाहतूक कोंडी निर्माण होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे अवजड वाहनांना नांदूर शिंगोटे गावातून प्रवेश झाल्यामुळे या वाहतूक कोंडी मध्ये आणखीच भर पडत आहे मोठमोठाले कंटेनर सुद्धा गावातून जात असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळा कारणीभूत ठरले आहे एकंदरीत नांदूर शिंगोटे करांची वाहतुकीची डोकेदुखी ही कधी थांबेल हाच प्रश्न निर्माण झालेला आहे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली दुकाने जी रस्त्यामध्ये आलेली आहे ती व रस्त्याच्या कडेला गटारे हेही तितकेच महत्त्वाचे आहे तेव्हा हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे अन्यथा हे जा करणारी वाहने व प्रवासी वर्ग तीव्र आंदोलन करील यात शंका नाही.
कोट :-
वाहतूक कोंडीच्या निवारणासाठी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणची वाहतूक कोंडी सुरळीत कशाप्रकारे होईल यासाठी प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.
वाहतूक कोंडी दूर करून रस्ता मोकळा कसा राहील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
उपसरपंच सौ ज्योती शेळके नांदूर शिंगोटे ग्रामपंचायत




