परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन: नारायणगावहून नाशिकला पलायन ; नारायणगाव, नाशिक पोलिसांचा मुक्कामी संशयितांवर कडा पहारा, सकाळी घेणार ताब्यात
परदेशी पर्यटकांकडून हिट अँड रन:
नारायणगावहून नाशिकला पलायन ; नारायणगाव, नाशिक पोलिसांचा मुक्कामी संशयितांवर कडा पहारा, सकाळी घेणार ताब्यात
नाशिक प्रतिनिधी
सध्या हिट अँड रन ही दुर्दैवाने फॅशन बनली असून यात निर्दोष पादचारी, वाहन चालकांचा नाहक बळी जात असल्याने ही एक सामाजिक समस्याही बनू पाहत आहे. बेधुंद, बेफान वाहन चालवायचे, वेगवेगळ्या नशा करून भरधाव वेगाने वाहन चालवून अपघात करायचा, एखादा जीव घ्यायचा, किंवा गंभीर जखमी, आयुष्यासाठी एखाद्याला जायबंदी करायचे आणि घटनास्थळावरून पळून जायचे.असे प्रकार वाढत आहेत.आपण कारणीभूत ठरलेल्या या अपघाताने जखमी झालेल्या निर्दोष व्यक्तीला उपचार मिळायला हवेत एव्हढ्याही जाणीवा शिल्लक उरलेल्या नाहीत. संवेदनाच ठार मेल्यात या नराधमांच्या.
असाच एक संवेदनशून्य प्रकार नारायण गाव जवळ घडला असून रिक्षा चालवणाऱ्या परदेशी महिलेने पुणे नाशिक महा मार्गांवर एका दुचाकी स्वाराला अक्षरशः फरफटत नेले. आणि अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतरही थांबून नेमकं घडलंय काय? यात कुणी जखमी झालंय का? त्यांना उपचाराची आवश्यकता असेल? याचे भान न ठेवता या परदेशी महिलेने आपल्या अन्य सहकाऱ्यांसह घटना स्थळाहून पलायन केले. आणि थेट नाशिक गाठले.
या हीट अँड रन घटनेत नारायण गावच्या बाळासाहेब डेरे यांचा मृत्यू झाल्याचे दुर्दैवी वृत्त आहे.रिक्षा चालवणाऱ्या परदेशी महिलेकडून दुचाकी स्वाराला धडक दिल्यानंतर घाबरलेले परदेशी पर्यटक नारायण गाव येथून नाशिकला पळाले. सध्या हे पाचही पर्यटक नाशिकमधील एका हॉटेलमध्ये मुक्कामी असून त्यात तीन पुरुष दोन महिलांचा समावेश आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या रिक्षाची चालक महिला असल्याने तिला रात्री अटक करणे शक्य नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. परदेशी पर्यटक पळून जाऊ नयेत, म्हणून ते मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर नाशिक आणि नारायणगाव पोलिसांचा खडा पहारा आहे.




