रशियात कार व ट्रक यांच्या अपघातात नाशकातील विद्यार्थी ठार; अभिषेकच्या निधनाने शहर हळहळले
रशियात कार व ट्रक यांच्या अपघातात नाशकातील विद्यार्थी ठार;
अभिषेकच्या निधनाने शहर हळहळले
नाशिक प्रतिनिधी
गणपतीसाठी नाशिकला येऊन आई वडील यांना भेटून, पुन्हा रशियात शिक्षणासाठी जात असताना, कजागीस्थान येथे कार व ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात नाशकातील विद्यार्थी ठार झाला आहे. अभिषेक युवराज जाधव ( वय २२ रा इंदिरा गांधी पुतळया जवळ जेलरोड नाशिक रोड ) अस ठार झालेल्या विद्यार्थाचे नाव आहे. अभिषेक हा रशियामध्ये एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या वर्षात शिकता होता .अभिषेक गणपतीसाठी नाशिकला आई वडीलांकडे आला होता . सोमवारी पहाटे तो विमानाने रशियाला गेला .अभिषेक व चार ते पाच मित्र कारने जात असतांना कजागीस्थान येथे रस्त्याच्या बाजूला मोठ्या इमारतीचे बांधकाम सुरु होते .तेथील ट्रकला काही तरी अडथळा आला वा तो ट्रक अचानक रस्त्यावर आला व अभिषेकची कार त्या ट्रकवर जाऊन धडकली .अभिषेक कार मध्ये ड्राँयव्हरच्या बाजूच्या सीटवर बसलेला होता .त्यामुळे अभिषेक जागीच ठार झाला तर अन्य मित्र जखमी झाले आहेत . अभिषेक हा आई वडीलांना एकुलता एकच मुलगा होता . त्याला एक लहान बहिण आहे .अभिषेकचे वडील नाशिक महानगरपालिका सिडको विभागात कर्मचारी आहेत .अभिषेकच्या आईने मागील पंचवार्षिक महापालिका निवडणूकीत शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती .
अभिषेकचे मोठे काका कैलास जाधव हे महिंद्र अँड महिंद्र कंपनीतील सेवानिवृत्त कर्मचारी आहेत .दुसरे काका हे व्यवसायीक आहेत . अभिषेकचा मृत्यू देह गुरुवारी सांयकाळ पर्यत दिल्लीहुन मुबंई व नतंर नाशिकला आणणार आहेत . अभिषेकच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .