दि. २७ रोजी ब्रह्माकुमारी उषादीदींचे जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन
दि. २७ रोजी ब्रह्माकुमारी उषादीदींचे जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन यावर मार्गदर्शन
नाशिक प्रतिनिधी :
आजच्या वेगवान, स्पर्धात्मक व धावपळीच्या जीवनामुळे मानसिक ताणतणाव वाढत चालला असून आत्मिक शांती व मानसिक संतुलनाची गरज अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नाशिक यांच्यावतीने जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी बी.के. वासंती दीदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आधुनिक जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात प्रजापिता ब्रह्मकुमारीस ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राज्य राजस्थान येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका व व्यवस्थापन प्रशिक्षिका राजयोगिनी बी.के. उषा दीदीजी आधुनिक जीवनातील ताणतणाव व्यवस्थापन (Stress Management in Modern Life) या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. राजयोग ध्यान, सकारात्मक चिंतन आणि आत्मिक जागृतीच्या माध्यमातून ताणतणावमुक्त, आनंदी व संतुलित जीवनशैली कशी विकसित करता येईल, याबाबत त्या उपस्थितांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
हा कार्यक्रम दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत कालिदास कलामंदिर, शालिमार, नाशिक येथे होणार असून ब्रह्मकुमारीस परिवारासह सर्व नागरिकांसाठी खुला आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा मुख्य संचालिका राजयोगिनी ब्रह्मकुमारी वासंती दीदी यांनी केले आहे.



