शैक्षणिक सहलीतून ऐतिहासिक गोष्टींना उजाळा*
*शैक्षणिक सहलीतून ऐतिहासिक गोष्टींना उजाळा*
सिन्नर प्रतिनिधी:
येथील माध्यमिक लोकशिक्षण मंडळाचे एस जी पब्लिक स्कुल माध्यमिक विभागाची शैक्षणिक सहल कोल्हापूर मार्गे सिंधुदुर्ग-मालवण परिसरात नेण्यात आली होती. ७डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेला संस्थेचे हरहुन्नरी सीईओ अभिषेक दादा गडाख यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे २५५ विद्यार्थी २० शिक्षक व २ कर्मचारी यांच्यासह सनराईज टूर्स अँड ट्रॅव्हल्स कपंनीच्या ५ लक्सरी बसेस ने विद्यालयाची सहल सिन्नर -ज्योतिबा -कोल्हापूर -अदमापूर -मालवण -सिंधुदुर्ग किल्ला-तारकर्ली बीच -कुणकेश्वर -देवबाग बीच या दिशेने रवाना झाली व परतीचा प्रवास करत १० डिसेंबर रोजी सुखरूप परतली. दरम्यान विद्यार्थ्यांना पुस्तकातून शिकवल्या जाणाऱ्या बऱ्याचश्या अकल्पिक व गूढ गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी या प्रगल्भ विचारसरणीतून कोल्हापूर येथील शाहू पॅलेस सारख्या ऐतिहासिक स्थळाची तर शिवकाळातील ऐतिहासिक स्थापत्य शास्त्रातील निपुणतेबाबत पुरावा देणाऱ्या सिंधुदुर्ग या जलदुर्गाची निवड करण्यात आली होती. कोल्हापूर येथील शाहू पॅलेस ची प्रशस्त व दिमाखदार इमारत बघून विद्यार्थ्याच्या डोळ्यांचे पारणें फिटले. पॅलेस च्या आतमध्ये असलेल्या शाहू महाराजांच्या काळातील स्वतःच्या वापरातील विविध वस्तूंचा संग्रह, राज्यकारभारातील प्रशस्त महाल, बैठक व्यवस्था, विशिष्ट काळात वापरलेली अत्यंत दुर्मिळ व विविधतापूर्ण हत्यारे, प्राण्यांचे मुखवटे ई. गोष्टींची प्रत्यक्ष अनुभूती भेटल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. परकीय आक्रमाणाच्या वेळी जलदुर्ग हा अत्यंत सुरक्षित कसा समजला जायचा याची प्रत्यक्ष अनुभूती सिंधुदुर्ग किल्ला बघितल्यानंतर विद्यार्थ्यांना भेटली समुद्र किनाऱ्यालगतच असलेल्या छत्रपती शिवाजी महारांच्या पूर्णाकृती स्मारकास भेट देत शिवगर्जनेने वातावरण दुमदुमून गेले.तसेच कोल्हापूर येतील कुलस्वामिनी श्री महालक्ष्मी मंदिरातील दर्शनानंतर आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थानास भेट देत शेवटी श्री कुणकेश्वर महादेव मंदिरास भेट देऊन गगनबावडा घटमार्गे सफरीचा आनंद लुटत विद्यालयाची सहल १० डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता सुखरूप विद्यालयात परतली. सहलीदरम्यान निवास मुक्काम, जेवण व नाश्त्याची उत्कृष्ट सोय करण्यात आल्याचे विद्यार्थ्यांनी व पालकांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख उपाध्यक्ष दौलतराव मोगल सीईओ अभिषेक गडाख प्राचार्य एस एल चौधरी सर यांनी सहलीतील सहभागी विद्यार्थी व शिक्षक वृंद यांचे कौतुक केले आहे.



