क्राईम

डांबर-सिमेंट खडी कच घेऊन महापालिकेत धडक! छावा क्रांतिवीर सेनेचा खड्डे-दुरुस्तीचा अल्टिमेटम


डांबर-सिमेंट खडी कच घेऊन महापालिकेत धडक!

छावा क्रांतिवीर सेनेचा खड्डे-दुरुस्तीचा अल्टिमेटम

 

नाशिक –प्रतिनिधी

“शहरातील खड्डे लोकांच्या जीवावर उठले आहेत, सात दिवसांत दुरुस्ती नाही तर रस्त्यावर उतरणार!” — असा इशारा देत छावा क्रांतिवीर सेनेने आज नाशिक महानगरपालिकेत धडक देत प्रतीकात्मक निषेध नोंदवला. आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन देताना सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी खडी,कच, डांबर व सिमेंटचे पोते भेट म्हणून दिले.

पावसाळ्यात शहरातील मुख्य व उपमार्गांवर असंख्य खोल खड्डे तयार झाले आहेत. अपघात, ट्रॅफिक जॅम आणि आजारांचा धोका वाढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. याशिवाय, महापालिकेच्या रुग्णालयांत उपचार न करता रुग्णांना जिल्हा रुग्णालयात धाडण्याच्या प्रकारावरही सेनेने संताप व्यक्त केला. जिल्हा रुग्णालय आणि महापालिका आरोग्य विभागाची तातडीने बैठक बोलावून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

………..

प्रमुख मागण्या: –

खड्ड्यांची तात्काळ दुरुस्ती व इमर्जन्सी पॅचवर्क

ट्रॅफिक जॅम कमी करण्यासाठी योजना

नालेसफाई व रोगप्रसार रोखणे

दोषी कंत्राटदारांवर कारवाई

रस्ते कामांसाठी गुणवत्तेची हमी व सार्वजनिक देखरेख

……….

“नाशिक शहरातील खड्डेही लोकांच्या जीवावर उठलेली आपत्ती आहे त्यासाठी आज आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त यांना डांबर व सिमेंट देत नाशिक महानगरपालिकेने नाशिक शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

महापालिकेने सात दिवसांत कृती आराखडा जाहीर केला नाही, तर रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलन करू. खड्ड्यांवर राजकारण नाही, तर नागरिकांचा हक्क हवा आहे.”

-करण गायकर 

संस्थापक अध्यक्ष 

छावा क्रांतीवीर सेना 

 

निवेदनाचा आशय :- नाशिक शहरातील रस्त्यांची अवस्था सध्याच्या पावसाळ्यात अत्यंत दयनीय झाली आहे.शहरातील विविध मुख्य व उपमार्गांवर असंख्य खोल आणि धोकादायक खड्ड्यांमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून वाहतुकीची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत अपघातांचे प्रमाण वाढले आहे आणि नागरिकांचा रोष दिवसेंदिवस तीव्र होत आहे.

Advertisement

काही दिवसांपूर्वी नाशिक सिव्हिल सर्जन डॉ.चारुदत्त शिंदे यांनी एक आदेश काढला होता की,नाशिक शहरातील रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवू नये. त्या रुग्णांची तपासणी किंवा त्यांच्यावर उपचार हे महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये करावे आम्ही त्यांची भेट घेतली असता त्यांच्याकडनं आम्हाला नाशिक महानगरपालिकेची रुग्णालय कुठलेही पेशंट महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी ठेवत नाही तर ते सर्व पेशंट जिल्हा रुग्णालयाकडे पाठवत असल्याची माहिती दिली त्यांनी दिलेली माहिती अत्यंत गंभीर आहे.त्यामुळे त्या विषयावर आपण तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालय व नाशिक महानगरपालिका आरोग्य विभाग यांची बैठक लावावी,त्या बैठकीमध्ये नेमकं कुणाचं काम चुकीचं आहे,हे नाशिक जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना स्पष्ट करून द्यावे.

यापूर्वीही अनेक सामाजिक संस्था, राजकीय पक्षांनी वेळोवेळी आंदोलन व निवेदने देऊनही महापालिका “कुंभकर्णाच्या निद्रिस्त अवस्थेत”असल्यासारखी वागत आहे.त्यामुळे छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने हे निवेदन देत असून मागण्या तातडीने मान्य न केल्यास संघर्ष तेवढाच प्रखर व व्यापक होईल.

प्रतिकात्मक निषेध:

या निवेदनासोबत छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने डांबर व सिमेंटचे प्रतिकात्मक स्वरूपात भेट देण्यात येत आहे जेणेकरून रस्त्यांवरील खड्ड्यांची गंभीरता प्रशासनाच्या लक्षात यावी.ही कृती ही फक्त व्यंगात्मक नव्हे तर जागृतीपर पाऊल आहे ज्यातून उद्देश स्पष्ट आहे,प्रशासनाचे लक्ष वेधून नागरिकांना दिलासा देणे .

या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष करण गायकर शिवाजी मोरे शिवा तेलंग नवनाथ शिंदे डॉ किरण डोखे आशिष हिरे नवनाथ वैराग योगेश गांगुर्डे आबा पाटील मनोरमा पाटील सविता वाघ गोरख संत भारत पिंगळे संजय तूपलोंढे किरण लवंड योगेश पाटील गोकुळ धोंगडे नारायण जाधव शुभम महाले अमोल शिंदे ज्ञानेश्वर पालखेडे राजाभाऊ खरात विपुल तेलंग जयेश मोरे अमोल देवरे मनिष तिवडे अनुराग निकम पंकज चौबे महेश हिरे दीपक पवार विशाल घागस दत्ता कवडे संदीप हिरे नवनाथ जगताप इमरान खान अनिल तिवारी विजय भवर पुंडलिक लांडगे सिद्धांत घोटेकर दत्ता महाराज पवार रवींद्र जयस्वाल परविन बिर्याणी ज्योती तिवारी शोभा जाधव भीमराव जाधव संकेत पिंगळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनात संस्थापक अध्यक्ष करण गायकर, शिवाजी मोरे शिवा तेलंग नवनाथ शिंदे डॉ किरण डोखे आशिष हिरे नवनाथ वैराग योगेश गांगुर्डे आबा पाटील मनोरमा पाटील सविता वाघ गोरख संत भारत पिंगळे संजय तूपलोंढे किरण लवंड योगेश पाटील गोकुळ धोंगडे नारायण जाधव शुभम महाले अमोल शिंदे ज्ञानेश्वर पालखेडे राजाभाऊ खरात विपुल तेलंग जयेश मोरे अमोल देवरे मनिष तिवडे अनुराग निकम पंकज चौबे महेश हिरे दीपक पवार विशाल घागस दत्ता कवडे संदीप हिरे नवनाथ जगताप इमरान खान अनिल तिवारी विजय भवर पुंडलिक लांडगे सिद्धांत घोटेकर दत्ता महाराज पवार रवींद्र जयस्वाल परविन बिर्याणी ज्योती तिवारी शोभा जाधव भीमराव जाधव संकेत पिंगळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *