क्राईम

गोवंश जनावरांची कत्तल: संगमनेरकर कुरेशीच्या नाशिक शहर पोलिसांनी बांधल्या मुसक्या; ४०० किलो गोवंश मांसासह स्वीफ्ट जप्त


 गोवंश जनावरांची कत्तल:
संगमनेरकर कुरेशीच्या नाशिक शहर पोलिसांनी बांधल्या मुसक्या;
४०० किलो गोवंश मांसासह स्वीफ्ट जप्त

नाशिक प्रतिनिधी
संगमनेर शहरातील गोवंश कत्तलखाने अहिल्यानगर पोलिसांनी उध्वस्त केल्याचा दावा नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईतून फोल ठरला असून संगमनेर शहरातील एका कुरेशीला शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने त्याच्या स्वीफ्टमधील ४०० किलो गोवंश मांस, स्वीफ्टसह ताब्यात घेतले आहे.
दिनांक १८/०३/२०२५ रोजी गुन्हेशाखा युनिट एकचे पोअं राम बर्डे व पोअं राहुल पालखेड यांना सिल्व्हर रंगाच्या स्वीप्ट कारमध्ये गोवंश जातीचे जनावरांची कत्तल केलेले मांस गाडीमध्ये विक्री करीता येणार असल्याची बातमी मिळाली होती. त्यावरून पोउनि चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळुंके, पोअं विलास चारोस्कर, पोअं नितीन जगताप, पोअं आप्पा पानवळ, पोअं राम बर्डे, पोअं राहुल पालखेडे, पोअं जगेश्वर बोरसे, श्रेणी पोउनि किरण शिरसाठ अशा पथकाने शिवनेरी चौक, भद्रकाली नाशिक येथे सापळा लावुन स्वीप्ट कार क्रमांक एम.एच ०४-डी. एन-३११६ या मधील इसम अमीर असद कुरेशी, वय-२९वर्षे, रा-कादरी मस्जीद जवळ, मुगलपुरा, नाशिक पुणे हायवे संगमनेर ता. संगमनेर जि. अहिल्यानगर यास पकडले असता त्याचे ताब्यात ४०० किलो गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेली मांस मिळून आले. सदरचे गोवंश मांस हे कोठुन व कुणास विक्री करीता आणले बाबत त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने सदरचे गोमांस हे संगमनेर येथुन नाशिक शहरातील नटु चौधरी, रा-बागवानपुरा भद्रकाली नाशिक यास विक्री करीता आणले असल्याचे सांगितले. अमीर कुरेशी यांच्या ताब्यातुन गोवंश जातीच्या जनावरांचे बेकायदा कत्तल केलेले कातडी काढलेली मास सुमारे ४०० किलो वजनाचे गोमांस व वाहतुक करण्यासाठी वापरलेली स्विप्ट कार असा एकुण २,८०,०००/-रूपये किंमतीचा मु‌द्देमाल ताब्यात घेवुन सदर इसमाविरूध्द प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ चे कलम ५, ५ क, ९, ९ अ, ९ ब तसेच प्राण्यास कुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ एल, सह भा.न्या.सं. कलम कलम ३२५, ३(५) तसेच मो. वा. का कलम ६६ (१)/१९२ प्रमाणे भद्रकाली पोलीस ठाणेस फिर्याद देवुन त्यांना मुद्देमालासह पुढील कारवाईकामी ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement

दाखल गुन्ह्यांची माहिती:
अमीर कुरेशी हा सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध संगमनेर आणि नाशिक शहरात विविध गुन्हे दाखल आहेत.

भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक शहर

५९/२०२५ प्राणी संरक्षण अधिनियम

मुंबईनाका पोलीस ठाणे, नाशिक शहर

२५/२०२४ प्राणी संरक्षण अधिनियम
संगमनेर शहर पोलीस ठाणे

३१९/२०२२ भा.द.वि कलम ३०७ प्रमाणे, ७२७/२०२१ प्राणी संरक्षण अधिनियम आणि ६६७/२०१९ प्राणी संरक्षण अधिनियम

ही कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क. १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोउनि चेतन श्रीवंत, पोउनि सुदाम सांगळे, पोहवा महेश साळुंके, पोअं विलास चारोरकर, पोअं नितीन जगताप, पोअं आप्पा पानवळ, पोअं राम बर्डे, पोअं राहुल पालखेडे, पोअं जगेश्वर बोरसे, श्रेणी पोउनि किरण शिरसाठ यांच्या पथकाने केली आहे.

:
संगमनेर शहरात गेल्या महिन्यात या जातकुळीतील कत्तलखाने जमीनदोस्त केल्याचा दावा केला गेला. त्याचे सारे श्रेय नव्यानेच आमदार झालेले अमोल खताळ यांनी घेतले होते. त्यानंतरही संगमनेरमधून या कुरेशीने गोवंशाचे मांस विक्रीसाठी नाशिक शहरात आणले. यावरून कत्तलखाने उध्वस्त करण्याचा केवळ इव्हेंट तर संगमनेरमध्ये साजरा झाला नाही ना? अशी शंका उपस्थित करण्यास पुरेसा वाव आहे. नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती घेऊन अहिल्यानगर पोलिसांनी संगमनेर शहर परिसरात अजूनही सुरु असलेल्या या कत्तलखान्यांचा बाजार उठवला तर आणि तरच गोवंश हत्येविषयी या नव्या व्यवस्थेला चीड आहे असे हमखास म्हणता येईल. अन्यथा केवळ राजकीय कुरघोडी.. दुसरे काय?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *