अडाणी जमीन मालकांची फसवणूक; अल्प रकमेत भुखंड अडकवणाऱ्या माफीया रॅकेटला वेसण कुणी घालायची ?
अडाणी जमीन मालकांची फसवणूक; अल्प रकमेत भुखंड अडकवणाऱ्या माफीया रॅकेटला वेसण कुणी घालायची ?
प्रशांत हिरे / सुरगाणा
कष्ट न करता पैसा कमविण्यासाठी माणूस कोणत्या थराला जातो,याविषयी अंदाज बांधणे अवघड असले,तरी उघड होणाऱ्या प्रकरणांमधून अशा माफीयांची कृष्णशैली जवळपास सर्वांना परिचीत होऊ लागली आहे. ‘माफिया’ सर्व क्षेत्रातील’ माफिया सतत वेगवेगळ्या क्लुप्त्या योजून सामान्य आणि कायद्यात अडाणी असलेल्या माणसाला आपल्या जाळ्यात फसवू लागले आहेत. व्यवस्थेत असलेली आपली पद, प्रतिष्ठा अन पैशांच्या जोरावर गरीब, अडाणी, गरजू, शेतकऱ्याचा फायदा उचलून खोटे दस्तऐवज बनवून शेतकऱ्याच्या नावावरील जमीन स्वतःला परवडेल अन शक्य होईल,त्या मार्गान हडप करण्यासाठी कायद्याच्या चौकटीत न बसणारी कागदपत्रे तयार करून जमीन हडप करणारी एक सक्रिय गैंग सर्वत्र तयार झाली आहे. ज्यात खरेदीअखेर शेतकरी आपल्या क्षेत्राबाबत केवळ एवढं मोठं “दार” लिहून घेणाऱ्याकडे पडलंय तर त्याच्या नादी का लागावे म्हणून सोडून देतो अन हि ‘भूमाफिया गैंग’ सर्वांसमोर चोरी करून निघून जाते. अगदी याच शैलीतील सर्वत्र दिसणारा एक प्रकार म्हणजे भोगवटदार वर्ग २ च्या जमीन मालकांची फसवणूक, होय फसवणूकच! ज्याच्याकडे पैसे आहे,त्यांनी करायचे काय उत्तर अशा जमीन असणाऱ्या अडाणी जमीन मालकांना पटवायचे, कमीत कमी रक्कम देऊन साठेखत मारायचे,अन ते साठेखत मारत असताना त्यावर कुठलीही मुदत न टाकता वर्षानूवर्ष त्या जमीन मालकाला फिरवत राहायचे. ना व्यवहार पूर्ण करायचा ना त्याला भेटायचे. अडाणी जमीन मालक हतबल होऊन आपला हक्क सोडायला तयार होतो. खरेदी विक्री सदरात असे किती प्रकरणे झालेली आहेत अन प्रलंबित आहे, याची उच्च स्तरावरून चौकशी होऊन अशा भूमाफिया अन त्यांच्याशी मिलीभगत करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळल्यास खरेदी-विक्री मध्ये वाढत चाललेली माफियागिरी थांबून जनसामान्यांना न्याय मिळेल.