जालना येथील दसरा मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातून छावा क्रांतिवीर सेनेचे हजारो पदाधिकारी उपस्थित राहणार
जालना येथील दसरा मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातून छावा क्रांतिवीर सेनेचे हजारो पदाधिकारी उपस्थित राहणार
नाशिक प्रतिनिधी
सालाबादप्रमाणे याही वर्षी जालना जिल्ह्यात छावा क्रांतिवीर सेना आयोजित दसरा मेळावा रविवार,13 ऑक्टोबर 2024,रोजी सायंकाळी 5 वाजता मातोश्री लॉन्स,अंबड-जालना रोड,जालना येथे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.
या भव्य मेळाव्याचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, अध्यक्षस्थानी माजी मंत्री अर्जुन खोतकर,तसेच विशेष अतिथी म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील,कामगार नेते अभिजीत राणे, जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार,धर्मवीर सुनील बागुल,जालना मतदार संघाचे खासदार कल्याणराव काळे,आमदार नारायण कुचे,जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती :-
या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या नाशिक मध्यवर्ती कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत नाशिक जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते जालना येथे होणाऱ्या सहाव्या दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नियोजन बैठक घेतली असून,तालुका पातळीवर गाड्यांची व्यवस्था,होल्डिंग्ज,आणि शहरांमधील विभागीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे.
या बैठकीला संस्थापक अध्यक्ष करण गायकर,युवक प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग,केंद्रीय कार्याध्यक्ष विजय वाहुळे,युवा प्रदेश सरचिटणीस नवनाथ शिंदे,नाशिक जिल्हाप्रमुख आशिष हिरे,आयटी प्रदेश संपर्क प्रमुख वैभव दळवी,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ॲड.नवनाथ कांडेकर,उद्योजक आघाडी जिल्हाप्रमुख दादासाहेब जोगदंड,युवक आघाडी जिल्हा संघटक राहुल काकळिज,उत्तर महाराष्ट्र उद्योजक आघाडी अध्यक्ष प्रवीण पाटील, उपाध्यक्ष किरण बोरसे,महानगरप्रमुख अर्जुन फरकाडे,शेतकरी आघाडी उपजिल्हाप्रमुख नाना पालखेडे,नाशिक रोड विभाग प्रमुख नामदेव शिंदे आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यातील मुद्दे:
या दसरा मेळाव्यात मराठा आरक्षण,शेतकरी प्रश्न,छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन,कामगार कायद्याची अंमलबजावणी,महिला सक्षमीकरण,शैक्षणिक धोरणे,आरोग्य क्षेत्रातील सुधारणांसाठी आवाज उठविणे आदी मुद्यावर मंथन होणार आहे.
नाशिक जिल्ह्यातील तयारी: या भव्य मेळाव्यासाठी नाशिक जिल्ह्यातील सर्व तयारी पूर्ण झाली आहे.हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी,आणि छावा क्रांतिवीर सेनेचे निष्ठावंत जालना येथे या ऐतिहासिक मेळाव्याचा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत.