व्हॉईस ऑफ मीडियातर्फे सापत्न जाहिरात धोरणाविरुद्ध चार जुलैला उपोषणाची हाक
व्हॉईस ऑफ मीडियातर्फे सापत्न जाहिरात धोरणाविरुद्ध चार जुलैला उपोषणाची हाक
फादर बॉडीसह विविध विंगचा सहभाग
मुंबई प्रतिनिधी
एका बाजूला वृत्तपत्र क्षेत्र विविध समस्यांना तोंड देत असतानाच शासकीय पातळीवरून देखील विशेषतः जाहिरात धोरण अंमलात आणताना भेदभाव केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्याची ज्वलंत प्रचिती आली असून अनेक छोट्या वर्तमानपत्रांना, साप्ताहिकांना जाहिराती पासून डावलले गेले. अनेक असे विषय आहेत, की ज्या विषयाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रांमध्ये,साप्ताहिकांमध्ये छोटा मोठा असा भेदभाव करत अन्याय केला जातोय. याच अन्याच्या विरोधामध्ये येत्या चार जुलै रोजी राज्यभर आंदोलन छेडण्यात येत आहे.’व्हॉईस ऑफ मीडिया’चा साप्ताहिक विभाग त्यासाठी पुढाकार घेत असून ‘व्हॉईस ऑफ* *मीडिया’च्या फादर बॉडीसह सर्व विंगच्या प्रमुखानी,पदाधिकाऱ्यांनी ,सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी या लाक्षणिक उपोषणामध्ये सहभागी व्हावं. अधिक माहितीसाठी साप्ताहिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन
संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे ,प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के ,मुख्य संयोजक तथा कार्यध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी केले आहे.