निवडणुक वार्तापत्र* ( दिंडोरी )् *केंद्रीय नेतृत्वाकडून कांदा उत्पादकांची दिशाभुल ! स्थानिक लोकप्रतिना निवडणुकीत बसणार फटका*!! *कुबेर जाधव*
*निवडणुक वार्तापत्र* ( दिंडोरी )् *केंद्रीय नेतृत्वाकडून कांदा उत्पादकांची दिशाभुल ! स्थानिक लोकप्रतिना निवडणुकीत बसणार फटका*!! *कुबेर जाधव*
नासिक प्रतिनिधी
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी करून पाच सहा महिने उलटून गेले, निवडणुकीवर डोळा ठेवून अमर्याद कालावधी साठी निर्यात बंदी लादण्यात आली, त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले आहेत,त्यातच एक महिन्या पासून बाजार समितीचा अनागोंदी कारभारामुळे बाजार समितीचे लिलाव हमाल मापारी व व्यापाऱ्यां नि लिलाव बंद पाडले, त्यामुळे सर्वाधिक नुकसान उत्तप्पादक शेतकऱ्यांच होते आहे,शेती माल खरेदी, विक्री, आयात निर्यातीसाठी केंद्र सरकारने *NCEL* नावाची एक संस्था स्थापन केली,
वरील *NCEL* संस्थेमुळे केंद्र सरकारने भाव वाढीवर पूर्ण नियंत्रण आणले, याबाबत स्थानिक खासदार राज्यमंत्री डॉ भारती ताई कडुन शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता चुकीची दिशाभुल करणारी माहिती देण्यात आली,असा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनचा आरोप आहे, आत्ता पर्यंत नाफेड व इतर केंद्रीय संस्थांकडून शेतकऱ्यांच्या शेती मालाचे भाव पाडण्याचे व दलालांचे भलं करण्याचं काम केले आहे, केंद्र शासनाच्या तिजोरी मधुन करोडो रुपयांच्या मालाची खरेदी करायची,जिवनावश्क वस्तू कायद्याच्या नावाखाली फक्त शहरी ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून बफर स्टॉक करून टेवायचा, ज्या प्रमाणे साखरेचचा साठा केला जातो त्या प्रमाणे लाखो टन कांद्याची खरेदी करून टेव्हायची, आणि, ज्यावेळी बाजारात कांद्याची आवक व मागणी वाढली की साठवलेला कांदा ( बफर स्टॉक) वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये जिथे मागणी असते तेथे पाठवुन कांद्याचे भाव पाडायचे काम नाफेड अवलंबले जात आहे ,याचा फटका नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर बसत आहे,
खासदार भारती ताई व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी बोलताना
व्हिडिओ मध्ये बघितल्या प्रमाणे लाल कांदा ( Red Onion ) एक्सपोर्ट होत नाहीं अंस खासदार ताइच म्हणणं आहे. ते साफ चुकीचे आहे, माझं भारती ताईना सांगणं आहे की त्यांनी आपले (?) आपले शासन दरबारी वजन वापरून गेल्या तीन चार वर्षांत निर्यात झालेल्या कांद्याच्या नोंदी तफासाव्यात म्हणजे लाल कांदा निर्यातीची माहिती समोर येइल, या वर्षी सर्वात जास्त लाल कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी होती ,परंतु केंद्र सरकारच्या आडमुठ्या व धरसोड धोरणामुळे कांद्याची निर्यात होऊ शकली नाही,
*NCEL* या संस्थेमुळे कुठल्याही निर्यातदार व्यापाऱ्याला पुर्वी सारखे शेती माल निर्यात करता येत नाहीं कारण *NCEL* शिवाय *निर्यातच होत नसल्याने कांद्याचे भाव वाढत नाहीं हे डॉ भारती ताईंनी लक्षात घ्यावे,,या विषयावर खा, भारती ताईंनी अभ्यास करण्याची गरज आहे कारण एकाच कंपनीला एक्सपोर्ट करण्याचे टेंडर द्यायचे व आंतरराष्ट्रीय बाजारातून करोडो रुपयांचा नफा कमवायचा आणि शेतकरी तसेच आम जनतेला चुकीची माहिती देऊन दिशाभूल करायची, हे नाटक कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पक्कं ठाऊक झाले आहे, मी स्वतः अनेक वेळा ना भारती पवार यांना प्रत्यक्ष भेटून, फोन करून ,नाफेड कांदा खरेदी संदर्भात, तसेच ज्यास्तित ज्यास्त कांदा निर्यातीसाठी वाणिज्य मंत्री यांच्या कडे आग्रह धरावा म्हणून मी सातत्याने गळ घातली, परंतु गेल्या तीन चार वर्षांत एकदाही ना,भारती ताईंनी मनावर घेतले नाही, मी दिल्लीला गेले की तुम्हाला कळवते, वाणिज्य मंत्री यांची भेट घेऊन तारीख निश्चित करते,या पलीकडे काहीही केले नाही,भाउ,भाउ, म्हणून समजुत काढुन बोळवण केली गेली, आमच्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना दिल्लीत जाऊन किमान नाफेडच्या कारभाराची माहिती घेता आली असती, सद्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची हवा चांगलीच गरम झाली आहे, सुरुवातीला दुरंगी वाटनारी लढत हळूहळू तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे, कम्युनिस्ट पक्षाचे नेते* *जेपी* हे पुर्ण ताकदीने मैदानात उतरण्यासाठी कामाला लागले आहेत, सुरूवातीला महाविकास आघाडीला समर्थक देखिल अशीच चर्चा सुरू होती, तिन चार दिवसांपुर्वि दिंडोरी येथे हजारो आदिवासी बांधवांना एकत्र करून एल्गार पुकारला व मी निवडणुकीच्या मैदानात असल्याचे जाहीर करून टाकले, त्यामुळे महाविकास आघाडीला जबरदस्त दणका बसला,ड्यामेज कंट्रोल साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या अध्यक्षांनी तातडीने धाव घेत समजून काढण्याचा प्रयत्न केला,पण ते अपयशी ठरले आहेत, दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे लागोपाठ तीन वेळा खासदार राहीलेले,अजात शत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून नाशिक जिल्ह्यात ओळख असलेल्या मा खा हरिश्चंद्र चव्हाण यांची साधी विचारपूस ही पक्षानं केली नाही, त्यामुळे ते प्रचंड नाराज आहेत, त्यांच्या सोबत संपूर्ण मतदार संघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा मोठा गोतावळा आहे, कार्यकर्त्यांनी जर आग्रह धरलातर त्यांना उमेदवारी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही,मग मात्र विद्यमान खासदारांची डोकेदुखी नक्कीच वाढेल, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी पक्षाच्या काही कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार फिरवली जाते आहे,त्या पोस्टाद्वारे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आव्हान केले जात की तुम्ही जर विद्यमान खासदारांला निवडुन दिले नाही तर तुमच्या कांद्याला पुढील काळात मोदी सरकार बिलकुल भान मिळुच देनार नाही, असं काही मोदी भक्तांकडून सांगितले जाते आहे , त्यामुळे मतदार संघात कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून तिव्र संताप व्यक्त होत आहे,याचा फटका येत्या निवडणुकीत सत्ताधारी लोकप्रतिनिधींना बसेल हे नक्की,,
*कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक*