अंबड औद्योगिक वसाहतीत रिक्षा चालकाचा खून , अल्पवयीन संशयितासह तीन जण ताब्यात
अंबड औद्योगिक वसाहतीत रिक्षा चालकाचा खून
अल्पवयीन संशयितासह तीन जण ताब्यात
सिडको प्रतिनिधी
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी दारू पिण्याच्या वादातून खून झाल्याची घटना ताजी असतानाच
- अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षा चालकाचा खून केला आहे याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह तीन न जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ वय 38 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी दिनांक 10 रोजी रात्री दहा वाजून तीस वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन यांनी शंकर गाडगीळ यांच्या डोक्यात दांडूका मारल्याने गंभीर जखमी झाले. त्यानंतर जखमी गाडगीळ याला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. या प्रकरणी चुंचाळे अंबड औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार ढाकणे व पथक यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ संशयित रिक्षा चालक सोनू कांबळे व त्याचा भाऊ महेंद्र कांबळे व एक अल्पवयीन या तिघांना ताब्यात घेतले आहे. मयत व संशयित आरोपी हे चुंचाळे घरकुल भागात राहणारे आहेत. गाडगीळ व कांबळे हे दोघेही रिक्षा चालक आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार करत आहेत