हनीट्रॅपचा गंडा – पुरुषांचा ‘गुलाबजाम’ की ‘गुलामजाम’? वासनेचे काव्य आणि चालाख कवियत्री!
हनीट्रॅपचा गंडा – पुरुषांचा ‘गुलाबजाम’ की ‘गुलामजाम’?
वासनेचे काव्य आणि चालाख कवियत्री!
संगमनेर कारखान्याचा कर्मचारी प्रेमाच्या आमिषाला भुलला आणि थेट हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकून तब्बल ४५ हजाराला गंडला.
प्रश्न एवढाच की हे नेमकं गुन्हेगारांचे चलाखीचं साम्राज्य आहे की पुरुषांच्या भोळसटपणाची पराकाष्ठा?
या हनिट्रॅपचे कवित्व फार मजेशीर आहे. हे काव्य रचताना या कवियत्रीने सोशल मीडियावरून ‘प्रेम करायला सोबत मिळेल’ अशी चक्क जाहिरातच या कामगाराच्या पर्सनल अकाउंटला केली. हीच जाहिरात त्याच्या बँक अकॉउंटला चावून गेली.प्रेमासाठी व्याकुळ आयुष्यात नवा दिनकर उगवेल या भोळ्या आशेने पुरुषी भावना विरघळली. व्हिडिओ कॉलवर संभाषण सुरु झालं. मादक स्वर नसेल तर त्या काव्याला हनीची गोडी कुठून येणार? अन ट्रॅप कसा होणार? मग त्या कवियत्रीने व्हिडीओ कॉलवर त्याला अश्लील बोलायला भाग पाडलं.अर्थात हे सारं सुरु असतांना ते सारं संभाषण रेकॉर्ड झालं नसेल, यावर सहजा सहजी विश्वास कसा ठेवायचा?
झालं ही तेच “पैसे दे, नाहीतर सगळं व्हायरल करते ” अशी धमकी आली. आपला ‘प्रेमवीर’ कर्मचारी अक्षरशः गुलामाप्रमाणे ४५ हजार रुपयांचे हप्ते फेडत बसला.
पोलिसांत तक्रार झाली, गुन्हा दाखल झाला – पण दरम्यान हा प्रकार सोशल मीडियावर किती जणांचं आयुष्य उद्ध्वस्त करत असेल, याचा विचार करा!
हे सगळं सायबर गुन्हेगारांच्या टोळ्यांचं साम्राज्य आहे. पण त्याहून मोठं साम्राज्य आहे भाबडेपणाचं.
कारण, “फुकटचा गोडवा” दाखवणाऱ्या प्रत्येक मऊसर मेसेजला जर कोणी एवढं लळा लावणार असेल, तर गुन्हेगारांचं सोनं होतंच राहणार!
हनीट्रॅप म्हणजे गुलाबजामसारखा वरून गोड, आतून फसवणूकीचा कडवटपणा
सावध राहिलं नाही , तर प्रेमाचं आमिष एखाद्या बबलीचा गुलाम बनवणारच.
*हनीट्रॅपचं मृगजळ – संगमनेरचा धडा*
गावोगावी उपदेश, सावधानतेची चर्चा,
पण ‘मृगजळ’ दिसलं की मनाचं होतं भरतं.
संगमनेरचा एक मेहनती कारखाना कामगार,
जाळ्यात अडकला, कवियत्रीच्या लाघवी बोल व्यापारात
“शब्दांची शालिनी” म्हणाली –
प्रेमाच्या पंखांनी उडू या,
आणि भोळसट मनाने मान डोलावली,
संपूर्ण जगच तिच्या हातात देऊ या.
पण प्रेम नव्हतं, ते होतं कटकारस्थान,
कॉलवरचं हास्य होतं फसवणुकीचं भासमान.
ब्लॅकमेलच्या हुकमी पत्त्याने
पंचेचाळीस हजार उडवले हवेवर,
आणि हा भोळा माणूस
झाला फक्त पैशांच्या हप्त्यांचा बंदी .
सायबर टोळ्यांची ही चलाखी मोठी की
आपल्या समाजाचं भाबडेपण अधिक ?
जोवर गोडवा दिसतो,
तोवर होतात अंध
आणि नंतर उघडतात डोळे तेव्हा
खिसा रिकामा, सन्मान उद्ध्वस्त….
हनीट्रॅप म्हणजे गुलाबाचा सुगंध नव्हे,
तर काटेरी आहे सापळा
संगमनेरच्या या घटनेने शिकवलंय –
“जगात मोफत मिळतं तो असतो फक्त सापळा



