आज ग्रामिण पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ ; सहा लाख नागरिक होणार शपथ बद्ध!
आज ग्रामिण पोलिसांच्या वतीने अमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ
सहा लाख नागरिक होणार शपथ बद्ध!


नाशिक प्रतिनिधी
ड्रग फ्री इंडिया मोहिमेअंतर्गत नाशिक ग्रामीण पोलिस दलातर्फे “अमली पदार्थ विरोधी शपथग्रहण समारंभ” आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सकाळी ८ः०० वा संपुर्ण जिल्ह्यातील एकूण ९७० शाळा व महाविद्यालये सहभागी होणार असून ३ लाख ९४ हजार शिक्षक व विद्यार्थी या शपथग्रहणात सहभागी होतील.



कार्यक्रमाचे व्हिडिओ चित्रण ९ व्हीसी लिंकच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. तसेच, १५ ऑगस्ट निमित्त होणाऱ्या ग्रामसभेचे औचित्य साधून सर्व ग्रामसभांमध्ये अमली पदार्थ विरोधी शपथ देण्यात येईल व त्याचेही व्हिडिओ चित्रण केले जाईल.
उपस्थितीची नोंद घेण्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व ग्रामसभांचे ग्रामसेवक यांच्याकडून प्रमाणपत्र घेतले जाईल.



एकंदरीत विद्यार्थ्यांच्या सोबत ग्रामसभेतील एकूण गावकरी यांची संख्या पाहता साधारण पणे ६ लाख नागरिक उद्या शपथ ग्रहण करतील. या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.




