सिन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आवाहन
सिन्नर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना आवाहन
सिन्नर प्रतिनिधी
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना सिन्नर तालुका कार्याध्यक्ष संदीप एकनाथ आव्हाड यांच्या अथक प्रयत्नातून तसेच तालुका प्रहार संपूर्ण कमिटीच्या सहकार्याने सिव्हिल हॉस्पिटल नाशिक यांचे मार्फत दिव्यांगांसाठी रेल्वे सवलत सर्टिफिकेट काढणीसाठी बुधवार दि १०/०४/२४ रोजी सकाळी १०:०० वाजता सिव्हिल हॉस्पिटल नासिक येथे अपॉइंटमेंट घेऊन कॅम्प आयोजित केला आहे. सिन्नर तालुक्यातील सर्व दिव्यागं बांधवांनी सदर कॅम्पचा लाभ घेऊन रेल्वे कंन्सेशन सर्टिफिकेट काढून घ्यावे असे आवाहन सिन्नर तालुका कार्याध्यक्ष संदीप एकनाथ आव्हाड यांनी केले आहे.
चौकट :-दिव्यांग बांधवांनी सोबत आणावयाचे ओरिजनल कागदपत्र व झेरॉक्स प्रति*
*ऑनलाईन दिव्यांग सर्टिफिकेट
*अस्थिव्यंग ४०% च्या पुढील*
*कर्णबधिर १००%*
*मूकबधिर १०० %*
*अंध १००% )*
*यु डी आय डी कार्ड
* पासपोर्ट फोटो ५
* रेशन कार्ड
*आधार कार्ड