ताज्या घडामोडी

विश्वास दृढ करणारा पोलीस पत्रकार क्रिकेट सामना

  1. विश्वास दृढ करणारा पोलीस पत्रकार क्रिकेट सामना

    ..

    क्रिकेटच्या मैदानावरही पोलिसांची पत्रकारांवर मात

    नाशिक/मायकल खरात:-
    पोलिस आणि पत्रकार एकाच समाजाचे घटक आहेत. उभय घटकातील समन्वय जेव्हढा पारदर्शक तेवढी नाळ अधिक घट्ट विणली जाईल याची जाण असलेले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून पोलिस आणि पत्रकार यांच्या दरम्यान पोलिस कवायत मैदानावर खेळवला गेलेला क्रिकेटचा सामना उभायतामधील विश्वास अधिक दृढ करण्यास कारणीभूत ठरला.
    पत्रकार दिनाचे औचित्य साधून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलिस पत्रकार यांच्यात क्रिकेटचा सामना खेळविण्याची कल्पना मांडली. पोलिस उपायुक्त( गुन्हे) प्रशांत बच्छाव, परिमंडळ एकचे उपायुक्त किरण चव्हाण, दोनचे उपायुक्त मोनिका राऊत यांनी ती उचलून धरली, सहा. पोलिस आयुक्त सीताराम कोल्हे, शेखर देशमुख आदींनी आपल्या पोलिस दलातील सहकाऱ्यांसह प्रत्यक्षात आणली.
    पोलिस संघाचे कर्णधार उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि पत्रकार संघाचे कर्णधार संदेश केदारे यांनी प्रत्येक चेंडूगणिक प्रतिस्पर्ध्याला मात देण्याचा प्रयत्न केल्याने अखेरच्या चेंडूपर्यंत हा सामना रंगतदार ठरला. अखेर पोलिसांनी मैदानावरही पत्रकारांना मात दिली. एकूणच यंदाचा पत्रकार दिन लौकिकार्थाने पोलिस आयुक्तांनी स्मरणीय ठरवला.स्कोरर म्हणून देवानंद बैरागी, किशोर बेलसरे, तबरेज शेख यांनी तर पोलिस संघाचे व्यवस्थापन अशपाक यांनी केले.
    बॉक्स :-
     पत्रकार हा समाजाच्या व्यथा तसेच अवतीभवती घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचा वेध घेत असतो त्यावर शब्दांचे संस्कार करत वृत्तपत्राच्या माध्यमातून आधारस्तंभ म्हणून मिळालेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत लोकशाही टिकवून ठेवण्यास आपले योगदान देत असतो. 
    पत्रकार विविध व्यवस्थेतील मंडळींसोबत संपर्कात येत असतो मात्र पत्रकार आणि पोलीस ही दोन वेगवेगळी यंत्रणा असूनही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची भावना नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केली व पत्रकार दिनाचे औचित्य साधून या दोघांमधला समन्वय, विश्वास, संबंध लोकाभिमुख कार्य करण्यासाठी अधिक दृढ होणे गरजेचे आहे त्यासाठीच जास्तीत जास्त संपर्क व जवळीक साधल्यास सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि प्रवास सुखकर होतो, याची सुरुवात म्हणून पोलीस आयुक्त कर्णिक यांनी पत्रकार आणि पोलीस यांचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना खेळवला.
    बॉक्स :-
    पोलिस  आयुक्तांनी टॉस उडवला व पोलीस संघाने टॉस जिंकत पत्रकारांना प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली यामध्ये पत्रकार संघाने  उत्तम खेळाचे प्रदर्शन करत दहा षटकांमध्ये 80 धावा करत जिंकण्यासाठी शहर पोलिस संघापुढे 81 धावांचे आव्हान उभे केले. शहर पोलीस संघ देखील हे आव्हान स्वीकारण्यास सज्ज झाला.  एरवी सी.आर.पी. सी, आय.पी.सी च्या आकड्यांमध्ये कार्यमग्न असलेले पोलीस दल 81 धावांचा पाठलाग करू लागले. उत्तम खेळाचे प्रदर्शन करून अखेर विजयी धावांचं लक्ष पूर्ण करत शहर पोलीस संघाने सामना जिंकला. मात्र नाशिक शहर पोलिसांनी पत्रकारांकडे पुढे केलेला एक हात मैत्रीचा, यामुळे शहर पोलिसांनी फक्त क्रिकेटचा सामनाच नाही तर पत्रकारांना देखील जिंकलं. यावेळी नासिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुसंवाद वाढवण्यासाठी पुढे टाकलेलं एक पाऊल हे कौतुकास्पद असल्याची भावना उपस्थित सर्व पत्रकारांनी त्यांचे आभार मानत व्यक्त केली व अशा पद्धतीच्या समन्वय वाढवणारे उपक्रम अधून मधून राबवलेच पाहिजे असे मत मांडले.

    विश्वास दृढ करणारा पोलीस पत्रकार क्रिकेट सामना

    Advertisement

    ..

    क्रिकेटच्या मैदानावरही पोलिसांची पत्रकारांवर मात

    *नाशिक/मायकल खरात:-*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *