चल उठ मराठ्या रॅलीत सहभागी हो!! रॅली साठी काय तयारी करता येईल?
चल उठ मराठ्या रॅलीत सहभागी हो!!
रॅली साठी काय तयारी करता येईल?
नाशिक :रॅलीचा उद्देश मराठा एकजूट व ताकत दाखवून देणे हा आहे, त्यामुळे आपले नातेवाईक,कुटुंबीय,मित्र, व आपल्या संपर्कातील जेवढे आहेत त्यांना फोन,मेसेज, प्रतेक्ष भेटून रॅली त सहभागी होण्यासाठी आवाहन करा…
शक्यतो रॅलीला जाताना आपली स्वतःची गाडी व त्या गाडीवर आपला मुलगा, वडील, भाऊ, किंवा मित्र यांना घ्या.याच कारण आहे की प्रत्येकाची गाडी व त्यांच्याच घरातील व्यक्ती त्या गाडीवर घेतले तर संख्या वाढेल.
त्या दिवशी घरातून बाहेर पडण्यापूर्वी जेवण करूनच घर सोडा. प्रत्येकाने आपल्या सोबत दोन पाण्याच्या बाटल्या व दोन भाकरी व मोकळी भाजी सोबत घ्या. रॅलीत लांबच्या तालुक्यातून सामील झालेले आपले जे बांधव व भगिनी आहेत, त्यांची काळजीपूर्वक विचारपूस करा, व नेलेले जेवण जर तुम्ही खाणार नसाल तर त्यांना द्या.जर गर्दीमुळे तिथं फोनला नेटवर्क भेटेल च असे नाही त्यामुळे तुमची चुकामूक झाली तर आपल्या सोबत च्या व्यक्तीला रॅली संपल्यानंतर आपण कुठे एकत्र यायच ते ठिकाण ठरवा व पहिला जो व्यक्ती तिथे पोचेल त्यांनी आपला जोडीदार तिथं पोचेपर्यंत निघु नका.
जाताना व येताना रस्त्यावर व रॅलीच्या ठिकाणीं कोणताही अनुचित प्रकार होवू नये यासाठी काळजी घ्या. कारण जगात आपला समाज हा शिस्त आणि शांततेसाठी आदर्श मानला जातो हे प्रत्येक मराठयांनी विसरू नका.
सर्वात महत्वाचे कुठल्याही अफवेला बळी पडू नका. कायदा सुव्यवस्थेचा आदर करून लाखोंच्या क्रांती मोर्चा इतकीच शिस्त पाळून मराठा भगव्याची प्रतिष्ठा आणखी वाढेल,याची काळजी घ्या. आंदोलनाचा श्वास होऊन आरक्षण चळवळीला संजीवनी द्या. कुणाचाही दुःस्वास करू नका.
एक मराठा कोटी मराठा🚩
🚩मराठा एकजुटीची निस्वार्थ चळवळ🚩